-----------------------------------------------------------------------------------------------
केज (प्रतिनिधी) - केज तालुक्यातील परतीच्या पावसाने ऊस पिकांसह काढणीस आलेल्या सोयाबीन,बाजरी, कापसाचे मोठे नुकसान झाले असून याचे तातडीनेे पंचनामे करण्यात यावेत पंचनामे करताना टाळाटाळ करता कामा नये अशा सूचना तालुका प्रशासन व तहसीलदारांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सुचना केल्या आहेत.
केज तालुक्यातील विडा गटातील विडा, पिंपळगाव,सारणी सा., सांगवी सा. या गावात सोमवारी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सोनवणे यांनी बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचा ऊस वा-याने पडला असून इतर पिकांचेही नुकसान झाले आहे. याचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे. पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना भरपाई मिळावी याकरिता बजरंग सोनवणे यांनी तालुका प्रशासनासह तहसिलदारांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. यावेळी विडा गणाचे पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे, शहाजी गुटे,राजेंद्र पटाईत, दिपक वाघमारे, व शेतकरी उपस्थित होते.
COMMENTS