जैन इरिगेशची स्वालर पंम्प योजना शेतकऱ्यांनसाठी निघाली फसवी ?
----------------------------------------
केज प्रतिनिधी : . जैन इरिगेशन कंपनीने गेल्या तिन वर्षात शेकडो शेतकऱ्याना स्वालर पंम्पचे वितरण केले आहेत . मात्र हि योजना अनेक शेतकऱ्यांना फसवी असलेचे दिसुन येते काही शेतकऱ्यांचे पॅनोल उपटून गेले तर , काहीना कमी दाबाचा पंम्प दिला असलेने शेतकऱ्यांच्या शेतात आनखी पाणीच गेले नाही .
अनेक शेतकऱ्यांचे संच बंद आवस्थेत आहेत , शेतकरी व जैन कंपनी या दोघांन मधला दुवा म्हणजे महावितरण कार्यालय आहे . कंम्पनीस डिमांड चेक हाअर्थीक व्यवहार हा महावितरण , लाईट खात्यामार्फत केला जातो , शेतकरी या कार्यालयात हेलपाटे मारून थकले आहेत . जर शेतकऱ्यांची मोटार जळाली तर तिन तिन महिने त्याला ती मोटार दुरुस्त करूण मिळत नाही . त्याने लाईटचे विहीरी वरील कोटेशन भरण्याचा निर्णय घेतला तर स्वालरपंम्प योजनेचा लाभ घेतल्याने त्या शेतकऱ्यास लाईट कनेक्शन सुद्धा भेटत नाही . या वर्षी पाऊस चांगला झालेने पाणी भरपूर आहे . मात्र सदर योजनेने शेतकरी वर्ग हैराण झालेचे दिसत आहे . चोंडी, चोराबा ता . धारूर , जिवाची वाडी ता .केज येथील शेतकऱ्यांच्या महावितरण कार्यालय , बीड येथे लेखी तक्रारी आहेत . मा . मुख्य कार्यकारी अभियंता , महावितरण कार्यालय बीड यांनी लक्ष घालुन जैन इरिगेश स्वालर कंम्पनीस सक्त ताकीद दयावी अन्यथा शेतऱ्यांना आंदोलना शिवाय दुसरा पर्याय नाही .
भ्रम्हवनी वरून आमच्या प्रतिनिधीने मुख्य अभियंता महावितरण बीड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की उप अभियंता महावितण कार्यालय केज येथे अंबेकर यांच्याशी भेटा , मात्र आंबेकर यांनी फोन घेण्यास टाळले.
COMMENTS