माजलगाव(प्रतिनिधी)
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त सुंदरराव सोळंके महाविद्यालयात दि. 21 ते 24 या कालावधीत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून वृक्षारोपण करण्यात आले.
दि 21 सप्टेंबर रोजी विकास समितीचे सदस्य अॅड. बी. आर. डक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तर 22 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी स्वयंसेवकांना स्वावलंबन व फिट इंडिया मुव्हमेंट संदर्भात माहिती देण्यात आली. दि 23 रोजी म.शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिनी वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ. के. बी.गंगणे तर प्रमुख पाहुणे पत्रकार प्रा.सुदर्शन स्वामी हे होते यावेळी कार्यक्रमाधिकारी प्रा बालाजी बोडके, कार्यक्रमाधिकारी प्रा उमेश राठोड व विद्यार्थी प्रतिनिधी आदिनाथ गिलबीले, प्रथमेश आमले, गणेश तौर, वैजेनाथ चाळक आदि स्वयंसेवकांनी श्रमदान केले.
COMMENTS