माजलगाव/प्रतिनिधी
रा.स्व.संघ, जनकल्याण समिती, रोटरी क्लब, सिद्धीविनायक अर्बन व भाजपा सहकार आघाडी सह वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांच्या माध्यमातून आपण समाजाचे देने लागतो हा विचार करून गरजू व गरीब लोकांना नेहमीच मदत करून सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ.प्रशांत पाटील यांनी निखिल अंजना जाधव रा. जाफराबाद जि. जालना यांचे सिद्धीविनायक अर्बन माजलगाव यांच्याकडे ICICI BANK च्या अकाउंटला चुकून तिन लाख रु.चे RTGS आले होते तेंव्हा संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या संस्थेतील स्थाफ यांनी चौकशी करून व त्या व्यक्तीची माहिती काढून त्या व्यक्तीस RTGS ची रक्कम रु. तिन लाख परत केले. त्यांच्या माणुसकी व प्रामाणिक पणाबद्दल ICICI BANK शाखा माजलगाव तर्फे सचिन परदेशी यांनी सिद्धीविनायक अर्बन शाखा माजलगाव येथे जाऊन संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित सिद्धीविनायक अर्बन चे संचालक तथा न.प. पाणीपुरवठा सभापती विनायक रत्नपारखी संस्थेचे स्थानिक सल्लागार तथा भाजपा सोशल मिडिया संयोजक दत्ता महाजन व कर्मचारीवृंद .
COMMENTS