मादळमोही दि,२४ (संतोष भारती):-
पावसाने धुमाकुळ घातला असुन शेतकर्यांचा महत्वाचा खरीप हंगामातील पिकाचा हातातोडाशी आलेल्या घास हिसकावल्याने गेवराईचे तहसिलदार प्रशांत जाधवर यांनी स्वतः शेतात जावुन पंचनामे केले , व नुकसान झालेल्या पिकांची फोटो घेवुन शेतकर्याकडुन माहीती घेतली , यावेळी समाजिक कार्यकर्ते जे डी शहा तलाठी पांढरे व शेतकरी यावेळी होते,
महाराष्ट्रात गेली आठ दिवसा पासुन पावसाने धुमाकूळ घातला आहे, खरीप हंगामातील संपुर्ण पिके हातातुन गेल्याने शेतकरी हातबल झाला आहे, या अतिवृष्टी नुसकान झालेल्या पिकाचे पंचनामे करा आसा आदेश मिळताच स्वतः गेवराईचे तहसिलदार प्रशांत जाधवर रामपुरी, मनुबाई जावळा या गांवी गेले, सोयाबीन, कापुस , भुईमूग, तुर,व इतर पिकाची पाहणी करत पंचनामे केले,अतिवृष्टी नुकसान झालेल्या पिके पाहुन शेतकरी हातबल झालेल्या प्रत्यक्ष तहसीलदार यांनी पाहातच स्वतः भावुक होवुन योग्य ती मदत मिळेल असे आश्वासन त्यांनी शेतकर्यांना दिले,शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला खरीप हंगामातील पिक डोळ्यासमोर वाया गेल्याने शेतकरी हातबल झाला आहे
कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी
शेतकरी झाला हातबल!
-------------------------------------------------------
जगायचं कसे आसा प्रश्न बळीराजाला पडला आहे,नेहमीच चक्रव्यहात सापडलेल्या शेतकर्यांना सावरण कठीण झाल आहे, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी या दोन्ही कसोटीत बळीराजाचा चुराडा तर होणार नाही ना अशी भिंती व्यक्त होत आहे,स्वतंत्र च्या सत्तरी नंतरही बळीराजाची व्यथा संपत नाही,हा मोठा खेद म्हणावा लागेल,
चैकट
शासनाची तोडकी मदत म्हणजे जगण्यासाठी कुबड्या
--------------------------------------;-------------------- -
दुष्काळ असो व अतिवृष्टी त्यामध्ये नुकसान झालेली मदत मिळणे म्हणजे जगण्यासाठी मिळालेल्या कुबड्याच म्हणाव्या लागतील अतिवृष्टी झाली नसती तर भरभरुन मिळाल आसत पंरतु शासनाच्या तोडक्या मदतीची वाट पाहात जगण्याची वेळ देशाच्या पोशिंदा वर यावे,ही परिस्थिती वाईटच आहे, हे मात्र नक्की!
COMMENTS