केज प्रतिनिधी.
नांदूर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य संतोष हांगे हे मागच्या टर्मलाही जिल्हा परिषद सदस्य होते सदस्यत्व मिळाल्यानंतर पाच वर्षात त्यांनी कधीही बेलगाव ला येऊन बेलगावच्या नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या नाहीत पण 2017 चे जिल्हा परिषद चे इलेक्शन जवळ आल्यानंतर बेलगावात आले आणि गावातील नागरिकांना म्हणाला यावेळेस मी शंभर टक्के तुमच्या गावचा विकास करणार तुम्ही मला मतदान करा आता एखादं काम सांगा मी ते करून टाकतो आजच सुरुवात करतो असं सांगितल्यावर गावातील नागरिकांनी बेलगाव ते माळवाडी रस्ता करायला सांगितले व त्यानंतर थोडे दिवस त्याने आज करतो उद्या करतो म्हणून फिरवाफिरवी केली पण गावातील लोकांनी त्याचा जरा जास्तच फॉलोअप घेतला मग त्याने एके दिवसी यंत्रणा (जेसीबी ट्रॅक्टर) लावली आणि आणि म्हणाला हा रोड थोडा मोठा करतो म्हणून त्यांनी बेलगाव ते माळेवाडी या रोडच्या दोन्ही बाजूची मोठी मोठी झाडे जेसीबीने उखडून टाकली, झाडे उघडून टाकेपर्यंत इलेक्शन झाले त्यानंतर पुन्हा एकदा संतोष हांगे नांदूर सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आणि आता जवळपास तीन वर्ष झाली संतोष हांगे यांनी बेलगाव कडे डोकुनही बघितलं नाही त्यामुळे रस्ता करायचा तर प्रश्नच नाही तो केलाच नाही अगोदरच आपल्या जिल्ह्याला पाऊस कमी असतो संतोष हांगे यांनी 100/ 50 झाडे न लावता हजारो झाडांची कत्तल केली. यासंदर्भात वन विभागाने थोडं लक्ष घालावं कारण रस्त्याचे काम केलं असतं आणि झाड काढली गेली असती तरी म्हणता आलं असतं की रस्त्यामध्ये झाडे आली होती किंवा रस्त्याला अडथळा होत होता त्यामुळे ते काढण्यात आली पण येथे रस्त्यातच काम झालं नाही आणि विनाकारण हजारो झाडांची कत्तल केली आहे काढलेली झाडे एवढीही रस्त्याच्या जवळ नव्हती झाडे काढली नसती तरी रस्त्याला काही अडचण झाली नसती पण त्यांना रस्त्याचे काम करायचे नव्हते म्हणून इलेक्शन होईपर्यंत काहीतरी काम चालू केले आहे हे दाखवण्यासाठी संतोष हांगे यांनी झाडे काढली. यामध्ये फक्त बेलगावच्या नागरिकांचा पिळ निघत आहे बेलगाव ते माळवाडी या रस्त्याने चालत जायला खूप त्रास होत आहे गुडघ्याइतक्या चिखलातून प्रवास करावा लागत आहे साधी बैलगाडीही जाणेही मुश्कील आहे तर टू व्हीलर आणि फोर व्हीलर या गाड्या तर जाणं शक्यच नाही, या रोड वर खूप वेळा फंड आले होते यात काही जणांनी हात धुऊन घेतले आहेत तरी बेलगाव ते माळेवाडी या रोडची कोणकोणती कामे झाली आहेत किती फंड आला होता आणि तो कुठे गेला याची कसून चौकशी शासकीय अधिकाऱ्यांनी करावी.
COMMENTS