प्रतिनिधी - शेख आरीफ
उमरी :- सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले कार्यकर्ते सय्यद अहेमद यांची अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.सय्यद अहेमद भाई यांचे बहुजन चळवळीत बहुमोल असे योगदान आहे. शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी ते सदैव प्रयत्नरत असतात. त्याचबरोबर,
भ्रष्टाचार निर्मूलनार्थ काम करित असताना जनहितांच्या विविध मागण्यांप्रकरणी त्या प्रसंगी आक्रमकपणे कर्तव्यतत्पर कार्यकर्ते म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत.त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय बहुजन,ओबिसी, अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोशियशनचे संस्थापक अध्यक्ष सय्यद कलिम मुसा यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष बाळासाहेब सुरनर पाटील यांनी त्यांची मराठवाडा विभागाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना नुकतेच नियुक्ती पञ एका कार्यक्रमाप्रसंगी बहाल केले.
सय्यद अहेमद भाई यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.सय्यद अहेमद भाई यांचे विशेष अभिनंदन प्रहार दिव्यांग संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बालाजी रानवळकर यांनी केले.
COMMENTS