माजलगाव/भास्कर गिरी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव डक यांची मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी काही दिवसांपूर्वी निवड झाल्याने माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पद रिक्त झाले आहे. याची उत्सुकता माजलगावकराना लागली होती तर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या सभापती पदाचा अखेर 5 ऑक्टोबर 2020 चा मुहूर्त ठरला.
माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके निष्ठावंतांना आशिर्वाद देणार का? दुसऱ्याला! ही चर्चा शहरासह तालुक्यात होत आहे. खरात आडगाव चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवाजीराव शेजुळ यांनी प्रत्येक निवडणुकीत कशाची आशा न करता एक निष्ठेने आ. प्रकाश सोळंके यांचा सोबत राजकारणात पिढ्यानपिढ्या अखं आयुष्य घातलं त्यांच्या कामाची पावती म्हणून आ. सोळंके यांनी संभाजी (भारत) शेजुळ यांना माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केले आणि आता माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ची जागा रिक्त झाल्याने कोणाची वर्णी लागणार ? यात संभाजी शेजुळ का? वैजनाथ जाधव का? यापैकी दुसरे कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वंगीचे वैजनाथ जाधव यांनी राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करून पडत्या काळात आ. सोळंक यांना आजपर्यंत साथ दिली परंतु आ. प्रकाश सोळंके यांनी आज पर्यंत निष्ठावंतांनाच न्याय दिला आहे. सभापती पदासाठी कृउबासचे संचालक संभाजी शिवाजीराव शेजुळ व वांगी चे वैजनाथ जाधव तर उपसभापती पदासाठी संतोष यादव व मथुरादास घायतिडक यांची नावं चर्चेत आहेत.
आ. सोळंके यांच्या ताब्यात असलेल्या स्वराज्य संस्था या संस्थेवर आ. सोळंके यांनी आजपर्यंत निष्ठावंत कार्येकर्त्यानाच न्याय दिला असल्यामुळे 5 ऑक्टोबर 2020 रोजी माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाची निवड होणार आहे. यात निष्ठावंत कार्येकर्त्याची वर्णी लागणार आहे.
COMMENTS