महेंद्र पुरी, जिल्हा प्रतिनिधी हिंगोली
नांदेड परिक्षेत्राचे नुतन पोलिस उप महानिरीक्षक निसार तांबोळी हे गुरूवारी पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्या दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांच्या हस्ते हिंगोली शहरात पोलिस पेट्रोल पंप, बाँस्केट बाँल, स्केटिंग ग्राऊंड, ग्राँसरी शाँप चे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर नुतन डिआयजी तांबोळी यांनी जिल्ह्यातील तेराही ठाणेदाराची गुन्हे आढावा बैठक घेऊन कायदा व सुरक्षेचा आढावा घेतला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणेदारांना मार्गदर्शन करते वेळी पोलिस ठाण्यातील प्रलंबीत गुन्हे तात्काळ निकाली काढण्याच्या सुचना देत अगामी सण उत्सव बंदोबस्त, कोरोना च्या पार्श्वभूमीवर खबरदारी उपाययोजना बाबत मार्गदर्शन केले. तसेच तांबोळी यांनी ठाणेदाराला तंबी देत कुठल्याही ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे अढळल्यास संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा गर्भीत ईशारा डिआयजी तांबोळी यांनी दिला. यावेळी बोलताना डिआयजी तांबोळी यांनी अवैध धंदे चालक व अवैध धंद्याला प्रोत्साहन देणार्यांना मी कदापिही माफ करणार.नाही त्यामुळे सर्व ठाणेदार यांंनी याची दखल घ्यावी. तसेच ठाण्यात येणाऱ्या तक्रारदार यांना सन्मानाची वागणूक देऊन तात्काळ तक्रारीची दखल घेऊन योग्य कारवाई करावी व महिला तक्रारदार यांना ठाण्यात सन्मानजनक वागणूक द्यावी असे सांगितले.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपाधिक्षक रामेश्वर वैंजने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक जगदिश भंडारवार यांच्या सह जिल्ह्यातील तेरा ठाणेदाराची उपस्थिती होती. कायद्या पुढे कोणीही मोठा नसुन कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे आयजी तांबोळी यांनी आपल्या खास शैलीत ठणकावून सांगितले.
COMMENTS