*
*अखिल महा.प्रा.शिक्षक संघ,नांदेडच्या शिष्टमंडळा सोबत बोलतांना काढले गौरवोद्गगार.!*
--------------------------------------------------------------------------
नांदेड दि.30 सप्टें.2020
अखिल महाराष्ट्र प्रा.शिक्षक संघ,नांदेडच्या शिष्टमंडळाने *प्रदेशाध्यक्ष मा.देविदास बस्वदे* यांच्या नेतृत्वाखाली *जि.प.नांदेडच्या नूतन मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्रीमती.वर्षा ठाकूर मॅडम* यांची सदीच्छा भेट घेऊन अभिनंदन करून नांदेड जिल्हा परिषदेतील मुख्यकार्यकारी अधिकारी पदाच्या पुढील उज्वल कार्यास शुभेच्छा दिल्या.!
नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच एक महिला मुख्याकार्यकारी म्हणून श्रीमती वर्षा ठाकूर यांनी पदभार स्वीकारला आहे. यानिमित्ताने अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा नांदेडच्या वतीने शुभेच्छा पत्र व पुस्तक भेट देऊन स्वागत केले या प्रसंगी सर्वांचा परिचय घेत पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, शिक्षकांचे सर्वच आघाड्यांवर महत्वाचे योगदान असते याची मला जाणीव आहे. आपणा सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावत ठेऊ तसेच शिक्षकांचे महत्त्वाचे प्रश्ना सोडविण्यासाठी शिक्षक संघटना पदाधिकारी व अधिकारी यांची संयुक्त बैठक लवकरच घेऊ असे आश्वस्त करत अतिशय सकारात्मक पद्धतीने काम करन्याची ग्वाही शिष्टमंडळास दिली
यावेळी *,जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,जिल्हासरचिटणिस प्रल्हाद राठोड,कार्याध्यक्ष सुधाकर थडके, पद्दो.मुख्याध्यापक संघाचे,जिल्हाध्यक्ष डि.एस.धाञक, जिल्हासचिव प्रभु सावंत,श्री.शिवाजी पत.नांदेडचे चेअरमन तुका पाटील,उपाध्यक्ष संतोष कदम,नरसिंग जाधव,सुभाष पाईकराव,व संजय पुनलवार* आदी उपस्थित होते.
COMMENTS