केज प्रतिनिधी :- केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथे एका शौचास गेलेल्या ३२ वर्षीय महिलेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २० सप्टेंबर रोजी तुकुचीवाडी येथे रात्री ८:०० ते ८:३० वा. च्या दरम्यान एक ३२ वर्षीय विवाहित महिला ही तिच्या शेतातील बाजरीच्या पिकात शौचास गेली असता बाळकीसन चौरे हा नराधम तिच्या मागून शेतात गेला. त्याने पिडितेच्या हाताला धरून खाली पडले व तोंड दाबून तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
या अत्याचार प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून तो नराधम बाळकीसन शेषेराव चौरे वय ३८ वर्ष यांच्या विरुद्ध गु.र.नं ४००/३०२० भा.दं.वि. ३७६ व ५०६ नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी नराधम आरोपीला अटक केली. आरोपीला ३० सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
----------------------------------------------
COMMENTS