----------------------------------------------
केज प्रतिनिधी :- दलित चळवळीतील कार्यकर्ते चंद्रकांत खरात सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संलग्न असलेल्या रिपब्लिकन श्रमिक सेनेच्या बीड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक मा शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री नाअजितदादा पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी संलग्न असलेली रिपब्लिकन श्रमिक सेना ही असंघटित कामगारांच्या प्रश्नासाठी कार्यरत आहे. ही संघटना कामगारांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी शिखर संघटना आहे. चंद्रकांत खरात सर यांची कामगार आणि मागास प्रवर्गातील लोकांसाठी काम करण्याची तळमळ व आज पर्यंत त्यानी दलित चळवळीत केलेले विविध आंदोलने, मेळावे, मोर्चे आणि संघर्ष याची दखल घेत रिपब्लिकन श्रमिक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांनी चंद्रकांत खरात सर यांची बीड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे यांनी खरात सर यांना नियुक्ती पत्र देत त्याना कामगारांसाठी काम करून राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार व ना अजितदादा पवार यांचे विचार तळागाळातील कार्यकर्त्या पर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी पार्टीचे मजबूत संघटन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
- -------------------------------------------------
- चंद्रकांत खरात यांच्यावर बीड जिल्ह्या सोबतच उस्मानाबाद, औरंगाबाद या संपूर्ण मराठवाड्यातील जिल्ह्या बरोबरच सोलापूर जिल्ह्याचीही जबाबदारी येण्याचे संकेत दिसत आहेत.
- ------------------------------------------------
COMMENTS