..!
! केज | प्रतिनिधी : :- केज तालुक्यातील लाडेगाव येथील गायरान धारक मागील २५ वर्षापासून सदरील जमिनी कसून आपली व कुटुंबातील व्यक्तींची उपजिवीका भागवत आहेत. व खरीप व रब्बी हे दोन्ही हंगामातील पिके घेत असतात. सदरील कुटुंबाचा पूर्ण उदरनिर्वाह या जमिनीवर अवलंबून असल्यामुळे त्यांनी वेळोवेळी शासनदरबारी आपली कैफियत व मागण्या मांडून सदरील जमिनीच्या ७ /१२वर आपले नावे लावून द्यावीत हि मागणी केली आहे. यापूर्वी २००७ , २००८ , २०१४ व २०१५ मध्ये एकीची नोंद शासन दप्तरी केली गेली होती. परंतु २०१५ नंतर शासनाने यांची कोणतीही धकल किंवा नोंद घेतलेली नाही. या सगळ्याची शासनाने नोंद घ्यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे, प्रा. शिवराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली केज वंचित आघाडी व सदरील गायरान धारक यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन दिं. ३० /९ /२०२० वार बुधवारपासून केज तहसील समोर करण्यात येणार आहे. केज तहसील कार्यालया समोर सकाळी ११:००वाजल्यापासून हे धरणे आंदोलन करण्यात येईल. तरी प्रशासनाने वेळीच धकल घेऊन मागण्या मान्य कराव्यात. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी केज तालुकाध्यक्ष बाबा मस्के, जिल्हा सहसचिव सुदेश उर्फ दादा सिरसट, अजय भांगे, अशोक गायकवाड, विशाल धिरे, धनराज सोनवणे व गंगाधर सिरसट यांनी सदर गायरान धारक यांच्या मागण्या शासनाने तात्काळ दखल घेऊन मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे.
COMMENTS