*मौ.चक्री येथे शिक्षकांच्या ,शिक्षक आपल्या दारी, ह्या अनोख्या उपक्रमाला भरभरुन प्रतिसाद*

दिपक सुर्यवंशी प्रतिनिधी : - निवघा येथुन जवळच असलेल्या मौ.चक्री ता. हदगाव येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळा चक्री येथिल शिक्षक सध्या संबंध जग...

दिपक सुर्यवंशी प्रतिनिधी :


- निवघा येथुन जवळच असलेल्या मौ.चक्री ता. हदगाव येथिल जिल्हा परीषद प्राथमिक शाळा चक्री येथिल शिक्षक सध्या संबंध जगात थैमान घातलेल्या कोरोना या महाभयंकर रोगाचे सावट असतांना सुद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता मौ. चक्री गावामध्ये राबवित असलेल्या स्तुतितुल्य उपक्रमाला गावातिल विद्यार्थयासह पालकही भरभरुन साद देत आहेत मौ. चक्री यथे जिल्हा परिषद शाळेमार्फत सुरु असलेल्या 'शाळा बंद शिक्षण सुरु, या उपक्रमशील व तञस्नेही शाळेचे आदर्श मुख्याध्यापक


  श्री गोविंद डोके सर सहशिक्षक संदीप पांचारे सर, सहशिक्षिका श्रीमती अंबाळकर मॅडम , श्रीमती खिसे मॅडम, श्रीमती वानखेडे मॅडम यांनी शिक्षण सुरु राहावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्न पञीका तयार करणे व व्हिडिओ तयार करणे 


*शिक्षक आपल्या दारी* हा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमांतर्गत घरपोच स्वाध्याय सोशियल डिस्टन्स चे भान ठेवून पालक भेटी घेणे , विद्यार्थ्यांचा स्वाध्याय तपासणी करणे ,शासनाच्या हाकेला 'ओ' देत टीली मीली कार्यक्रम विद्यार्थी पाहतात का नाही याची माहिती घेणं . ऑनलाइन शिक्षणा बरोबर ज्या मुलाकडे स्मार्ट फोन नाही अशा मुलासाठी घरपोच स्वाध्याय देणे आदींच्या सहकार्याने आँनलाईन सह ऑफलाइन शिक्षण सुरू आहे.दीक्षाअँप वापरा संबंधी जनजागृती करणे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे, सदर कार्यक्रमाची ऑडिओ व्हिडिओ,व्हाट्सउप व्हिडिओ कॉलिंग व भ्रमणध्वनी च्या माध्यमातून, ऑनलाईन लिंक द्वारे अढावा या पध्दतीने ऑफ लाइन कार्याच्या आढावा घेणे या व अस्या बर्याच पद्धतीने हा उपक्रम यशस्वीरित्या गावात सर्व शिक्षक व शिक्षिका राबवत आहेत. 


गेली वर्षभर विविध नावीन्य पूर्ण उपक्रम शाळेत राबविण्यात येतात पण लॉक डाउन काळात सुध्दा उपक्रमात खंड पडून देता ऑनलाईन उपक्रमा बरोबर आँफलाईन उपक्रम देखील राबविला जात आहे हा स्तुतितुल्य उपक्रम राबवनार्या आदर्श मुख्याध्यापक डोके सर व सर्व टिमचे गावकर्यांसह परिसरातील नागरिकांतुन कौतुक केले जात आहे


 


कोरोना महामारिच्या काळात गावात सोशल डिस्टंगशिंगच्या काटेकोर नियमाचे पालन करुन चालु केलेल्या 'शिक्षक आपल्या दारी' हा उपक्रम आपल्या जिवाची पर्वा न करता राबवित असलेल्या सर्व शिक्षकांचे कार्य स्तुतिजन्य आहे गत दोन वर्षांपासून शाळेला लाभलेल्या नविन आदर्श मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतिल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धिक गुणवत्ते मध्ये समाधानकारक बदल घडवून आनलेला आहे मी पालक या नात्याने मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांचा तालुका प्रशासनाने कोरोनायोद्धा म्हणून सन्मान करावा यासाठी सर्व गावकऱ्यांच्या वतीने प्रयत्न करु 


प्रतिनिधी


शिव कदम


( ग्लोबल मराठवाडा )


 


 


गत दोन वर्षांपासुन आमच्या गावच्या शाळेतिल विद्यार्थ्यांच्या गुनवत्तेमध्ये बर्याच प्रमाणात समाधानकारक बदल झाल्याचे निदर्शनास येत आहे शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत ,शिक्षक आपल्या दारी, हा उपक्रम सध्या शाळेच्या वतीने राबवित असलेल्या मुख्याध्यापक व सर्व टिमचे अभिनंदन


दिलिपआप्पा कृष्णापुरे


( शालेय शिक्षण व्यवस्थापण समिती अध्यक्ष)


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group