----------------------------------------
प्रतिनिधी /माजलगांव
-----------------------------------
मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे कपाशी व सोयाबीनचे पीक घेणारा मराठवाडा सध्या पडत आसलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, पाऊस थांबावा व ऊन पडावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे जे काही ऊरली -सुरली पिके आहेत ते तरी पदरात पडावेत अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागली कपाशी भिजल्याने काळी पडली, सोयाबीन, कापुस,तुर ,भुईमुग या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे,आगोदर तिन वर्ष कोरडा दुष्काळ आणि आता दोन वर्षापासुन ओला दुष्काळ यामुळे शेतकरी संघटात सापडला आहे कापुस पिकासह सोयाबीन पिकाच्या उभ्या झाडांच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाल्यामुळे खरिपाची सर्वच पिके चिभडली आहेत. ऐवढे नुकसान झाले असतानांही तालुक्यांमध्ये कृषी सहायक हे पंचनाम्याच्या पथकात दिसत नाहीत शासकीय यंत्रणेत कुठे ताळमेळ दिसत नाही केवळ घोषणाबाजी आणि आश्वासने करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल असे वाटणे चुकिचे आहे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
अगोदरच सोयाबीनचे बियाणे खराब निघाल्यामुळे शेतकरी बांधवांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्यात आता निसर्गाने तोंडचा घास हिसकावून घेतल्यामुळे शेतकरी बांधव मोठा हवालदिल झाला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे सरसकट पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना मदत म्हणून द्यावी अशी मागणी सावता सेनेचे तालुका अध्यक्ष राम कटारे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केली आहे.
COMMENTS