---------
आष्टी(दादासाहेब बन) लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या संघर्षकन्या पंकजाताई मुंडे यांची भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव साजरा होत असतांनाच बीड जिल्ह्यातही कार्यकर्त्याकडून फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर जिल्हा परिषद गटाचे सदस्य व पंकजाताई मुंडे यांचे अत्यंत विश्वासू समर्थक म्हणून बीड जिल्ह्यात ओळख असलेले रामदास बडे व कार्यकर्त्यांनी मानूरसह विविध गावांत फटाके फोडून व पेढे वाटुन पंकजाताई साहेब मुंडे यांच्या निवडीचे स्वागत केले आहे या झालेल्या आनंदोत्सव कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे , जयसिंग सिरसाट, निवृत्ती बडे , बाबादेव बेळगे , भगवान पाखरे ,आयुब पठाण , नंदु सिरसाट , नागेश जायभाये , मिठ्ठूशेठ आघाव , राजेंद्र आव्हाड , भिवा पांडागळे , पोपट बेळगेसह असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS