मागील अनेक दिवसांपासून परभणी जिल्ह्यात चांगले अधिकारी यावेत अशी मानसिकता आणि मागणी सर्वस्तरातून होत होती.चांगले अधिकारी येत होते.मात्र गौण खनिजाच्या महसुला व्यतिरिक्त कायम उपेक्षितांना न्याय देण्यासाठी अंधातरी भूमिका ठेवत होते.गौण खनिजाच्या माध्यमातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देऊन शासनाचे फलित करण्यात हे अधिकारी धन्यता मानत होते.यामुळे सामान्यावर अन्याय होताना दिसत होता.अधिकाऱ्यांच्या मनात नसले तरीही ही परिस्थिती निर्माण होत होती.किंवा केल्या जात होती.तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणाऱ्या चुका अनावधानाने झाल्या असे म्हणणे वावगे ठरणार नाही.परभणी जिल्ह्याचा भाग पाहता जिल्ह्यात दक्षिणकाशी गोदावरी वाहत असल्याने जवळपास सर्वच तालुक्यांना या गोदावरीचा फायदा होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते.सेलू,जिंतूर या तालुक्यातुन लोअर दुधना जात असल्याने तेथील भागही सुपीक असल्याचे दिसते.मात्र शेतकऱ्यांवर कधी अस्मानी संकट येईल याचा नेम नसल्याचा प्रत्यय नुकताच आला आहे.होत असणाऱ्या जास्तीच्या पावसातून दिसून आला आहे.जिल्ह्यातील बहुतांश जमिनीचे आसमानी संकटामुळे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे स्पष्ट दिसत आहे.यात राजकीय पुढाऱ्यांमध्ये शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी चढाओढ लागणे गरजेचे असताना केवळ आ.रत्नाकर गुट्टे,आ.मेघना बोर्डीकर या वगळता सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी निवेदनापलीकडे काही केल्याचे दिसून येत नाही असे स्पष्ट होत आहे.यामुळे शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नाशी लोकप्रतिनिधींना काही देने आहे काय?असा सवाल उपस्थित होत आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आजारी मानसिकता अन प्रशासन विभागाची लागलेली कीड काही प्रमाणात दूर होत असल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आश्रुसाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर ठोक भूमिका घेताना दिसून येत आहेत.एकीकडे राज्याचे कृषिमंत्री शासनाकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसा नाही.असे वक्तव्य करुन शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळतात तर दुसरीकडे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर नुकसानग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जेवणाचा डब्बा स्वतःच्या गाडीत ठेवून चिखलातून वाट काढतात.आपण समाजाचे काही देने लागतो या मानसिकतेला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर स्वतःजागतात यातून जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी शेतकऱ्यांच्या अश्रूंची किंमत जाणवलेली दिसून येत आहे.त्याचबरोबर दहा दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीतुन आ.मेघना बोर्डीकर यांनी वाट काढत शेतकऱ्यांच्या संवेदना व्यक्त करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करत पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई द्या!असा अट्टाहास शासनदरबारी मांडला आहे.मूग काढणीवेळी पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांना काहीही मिळाले नाही मात्र शेतकऱ्यांचा आवाज म्हणून आ.मेघना बोर्डीकर विधानभवनात गरजल्या हे सर्वश्रुत आहे.यासोबतच गंगाखेडचे आ.रत्नाकर गुट्टे यांनी वाढत्या संकटाचा सामना करताना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना विचारात घेणे गरजेचे असल्याकारणाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक बोलावून मी चार लाख मतदारांचा आमदार असल्याचे स्पष्ट केले आहे.जिल्ह्याला लागलेल्या आजारी मानसिकतेतून सुधारण्यासाठी घेतलेले निर्णय कौतुकास्पद असल्याचे दिसते.त्यामुळे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र पॅटर्न राबविला जातोय का?असेच यातून दिसून येत आहे.मात्र या सर्व भूमिकेत सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी निवेदनापलीकडे काहीही केल्याचे दिसून आले नसल्याने यातही बदल होऊन शेतकरी प्रश्नांसाठी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मानसिकता आता जोर धरू लागली आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
पैठण:( दि. २३ ऑगस्ट २०२६) भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या संत ज्ञानेश्वर उद्यान...
COMMENTS