------------------------
- नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड समाजसेवा वैद्यकीय अधीक्षक यांच्यामार्फत कोरोना रूग्णांना कोरोना सेंटर मध्ये होणाऱ्या असुविधा ,गैरसोय टाळण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत त्यामुळे कोरोना रूग्णांचे जेवन ,पिण्याचे पाणी इत्यादी समस्या व वैद्यकीय सुविधा , रूग्णांना त्यांच्या नातेवाईकांसोबत मोबाईल द्वारे संपर्क घडवून आणणे , नातेवाईक आणि संबंधित कोरोना पेशंट यांची भेट होत नाही.तेव्हा त्यांना आपुलकिची आपलेपणाचा आधार देणे या सर्व सुविधा वैद्यकीय समाजसेवक अधिक्षक समुपदेशनाद्वारे करित आहेत त्यामुळे कोरोना सेंटर मध्ये वैधकिय समाजसेवा अधिक्षक कोरोना पेंशट साठी जिवन जगण्याची नवसंजिवणीच म्हणणे काही वावगे ठरणार नाही.. पिण्याचे पाणी असो जेवणाचा प्रश्न असो किंवा त्यांना होणाऱ्या वैद्यकीय उपचार कसे चालू आहे हे सांगण्यासाठी समाजसेवक अधीक्षक महत्त्वाची मोलाची कामगिरी करीत आहेत त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जीवन जगण्याच्या पद्धती योगा करणे स्वतःची काळजी घेणे हे पेशंटला समजून सांगण्यात येते आहे . कोरोना सेंटर मध्ये ज्या असुविधा असतिल ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळविण्यात येत आहेत.नांदेड येथिल कोवीड सेंटर मध्ये वैद्यकीय समाजसेवा अधिक्षक अनिल नागमवाड ,देवेंद्र जोग, गजानन वानखेडे,संजय रत्नपारखी, शरद आवचार..यांनी कोरोना रूग्णांसाठी जणू देवदुत बनुन सेवा करित आहेत...
COMMENTS