नांदेड :- जिल्ह्यात काल 3 ऑगस्ट २०२० रोजीच्या अहवालानुसार ६६ व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर २०३ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण १ हजार १०६ अहवालापैकी ८५४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २ हजार ३५९ एवढी झाली असून यातील १ हजार २० एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण १ हजार २३२ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १९ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ७ महिला व १२ पुरुषांचा समावेश आहे.
रविवार २ ऑगस्ट २०२० रोजी देगलूर येथील ७२ वर्षाची एक महिला, चौफाळा नांदेड येथील ६५ वर्षाचा एक पुरुष, नाटकार गल्ली देगलूर येथील ५६ वर्षाच्या एका पुरुषाचा शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे तर सोमवार ३ ऑगस्ट २०२० रोजी फुलेनगर कंधार येथील ६५ वर्षीय महिला जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या ९४ एवढी झाली आहे.
काल बरे झालेल्या ६६ कोरोना बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील २५, मुखेड कोविड केअर सेंटर येथील १३, भोकर कोविड केअर सेंटर येथील १, खाजगी रुग्णालय नांदेड येथील ५, हदगाव कोविड केअर सेंटर येथील ३, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथील ४, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील १५ अशा ६६ कोरोना बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
आरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये अर्धापूर तालुक्यात १, भोकर तालुक्यात २, बिलोली तालुक्यात ८, देगलूर तालुक्यात १९, धर्माबाद तालुक्यात ५, हदगाव तालुक्यात २६, कंधार तालुक्यात १, नांदेड ग्रामीणमध्ये २, किनवट तालुक्यात ५, मुखेड तालुक्यात २, नायगाव तालुक्यात ६, उमरी तालुक्यात ११, नांदेड शहरी ३३, परभणी २, यवतमाळ १ याप्रमाणे आरटीपीसीआर तपासणीद्वारे १२४ बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर अँटिजेन तपासणीद्वारे अर्धापूर तालुक्यात २, किनवट तालुक्यात ९, नायगाव तालुक्यात २३, बिलोली तालुक्यात ९, मुखेड तालुक्यात ११, नांदेड शहरात २५ याप्रमाणे अँटिजेन तपासणीद्वारे ७९ बाधित आढळले.
जिल्ह्यात १ हजार २३२ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ११६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ४६९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे ३९, नायगाव कोविड केअर सेंटर येथे ७०, बिलोली कोविड केअर सेंटर येथे ४०, मुखेड कोविड केअर सेंटर येथे १०५, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ८६, लोहा कोविड केअर सेंटर येथे ५, हदगाव कोविड केअर सेंटर ७०, भोकर कोविड केअर सेंटर २, उमरी कोविड केअर सेंटर ११, कंधार कोविड केअर सेंटर येथे १२, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे ३४, किनवट कोविड केअर सेंटर येथे २२, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे १०, खाजगी रुग्णालयात १०९ बाधित व्यक्ती उपचार घेत असून ५ बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे १ बाधित, हैदराबाद येथे २ तर मुंबई येथे २ बाधित संदर्भित झाले आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
- सर्वेक्षण – १ लाख ४९ हजार ४७६,
- घेतलेले स्वॅब – १६ हजार ६८६,
- निगेटिव्ह स्वॅब – १३ हजार १४७,
- आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या – २०३ ,
- एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती – २ हजार ३५९,
- आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या – २८,
- आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या – ०२,
- मृत्यू संख्या – ९४,
- रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या – १ हजार २०,
- रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – १ हजार २३२,
- आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या – ४७.
प्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
COMMENTS