धर्माबाद ( अहमद लड्डा ) धर्माबाद तालुक्यातील नायगाव गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
ह्या गावातील एक व्यक्ती जी कामानिमित्त नंदीपेठ जिल्यातील डोकेश्वरम गावात राहत होता, सध्या कोरोना महामारीमुळे तो आपल्या मुळ गावी म्हणजेच नायगाव मध्ये काल परत आला होता, तो परत आल्याची माहिती मिळताच त्याला सरपंच व ग्रामसेवक यांनी धर्माबाद तालुका प्रशासनास माहिती दिली असता प्राथमिक आरोग्य करखेली येथील डॉ.मंठेवाड व त्यांच्या टीमने तपासणी करून धर्माबाद येथे नेऊन कोरोना ची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तदनंतर त्याला कोवीड सेन्टर येथे दाखल करण्यात आले आहे.
नायगाव चे ग्रामसेवक जैस्वाल व सरपंच राजेश्वर सदनापोड आणि तलाठी आडे यांनी सदरील व्यक्तीच्या घराजवळील भाग प्रतिबंधीत केला असून, त्या कोरोना ग्रस्त च्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली तपासणी करून घ्यावी अशी सूचना गावात करण्यात आली आहे.
या गावात कोरोना चा पहिल्यांदाच शिरकाव झाला असून सध्या नागरिकात भीतीचे वातावरण आहे.
COMMENTS