*दहावीच्या बोर्ड परीक्षेत व्हिजन पब्लिक स्कूलचे

घवघवीत यश*


सोनपेठ/प्रतिनिधी


विश्वभारती जनसेवा प्रतिष्ठान परभणी संचलित व्हिजन पब्लिक स्कूल सोनपेठ या शाळेचा इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेचा एकूण निकाल १००% लागला आहे.विद्यालयातून एकूण ३३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.यापैकी ३३ ही विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तर ५ विद्यार्थ्‍यांना ९०% पेक्षा अधिक गुण मिळाले असल्याची माहीती विद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग दुकळे यांनी दिली.यासोबतच त्यांनी असेही कळवले की,२० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.तर ११ विद्यार्थी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातून सर्वप्रथम सुमित रविकुमार स्वामी ९६%आला आहे.तर सर्वद्वितीय कु.निकीता मधुकर स्वामी ९३%आली आहे.तृतीय प्रावीण्य घेऊन पुजा झाड ९२% तर चतुर्थ कदम शुभांगी ९१% गुण घेऊन गुणानुक्रमे उत्तीर्ण झाले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष पवार तसेच संस्थेच्या सचिव सौ.सारिका पवार,संस्‍थेचे संचालक विनोद पवार,गटशिक्षणाधिकारी शौकत पठाण,प्रा.डॉ पांडुरंग दुकळे,उपमुख्याध्यापक भगवान घाटुळ,रामेश्वर हुंबे तसेच शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
नांदेड : अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड यांची राज्य कमिटीच्या सचिव मंडळ सदस्यपदी नुकतीच निवड झाली आहे.
इमेज
वेतन करारात मान्य केलेल्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी गोदी कामगारांची सरकारविरोधात तीव्र निदर्शने*
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश
इमेज
मँगलोर येथे “सागर में योग” व्यवस्थापन शिक्षण उपक्रमाचे लोकार्पण*
इमेज