--------------------------------------------
रमेश इतापे/केज :- केज तालुक्यातील साळेगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
साळेगाव ता. केज येथील नवीन ध्वज स्तंभा जवळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी पोलीस हेडकॉन्स्टेबल महादेव जाधव यांचे हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकार गौतम बचुटे, नववनाथ गलफाडे, राजाभाऊ वरपे, ज्योतिकांत कळसकर, हनुमंत ताकतोडे, रामकीसन गालफाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बलभीम बचुटे, जय जोगदंड, अक्षय वरपे, सचिन राऊत, लक्ष्मण ओव्हाळ, दशरथ राऊत, पांडुरंग राऊत यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान साळेगाव ग्रामपंचत कार्यालय, जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा, सार्वजनिक आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती आणि शंकर विद्यालय साळेगाव यांच्या वतीनेही साठे जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच कैलास जाधव, मुख्याध्यापक काळे सर, राम राऊत, हनुमंत ताकतोडे आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
COMMENTS