परळीतील नामांकित फाउंडेशन इंग्लिश शाळेतील शिक्षिकास कोरोनाची लागण!
.
परळी:-
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फाउंडेशन स्कूल या नामांकित इंग्लिश शाळेतील एक शिक्षिक कोरोनाची लागण झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे .सध्या कोरोना विषाणू महामारीमुळे शिक्षण विभागाने शाळा बंदचे आदेश काढले असून या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षनासाठी सर्व शाळेत शिक्षक वर्ग हाजरी लावत आहे. यातच काल परळी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फाउंडेशन इंग्लिश शाळेतील शिक्षिक कोरोना बाधित झाल्याने शाळेतील सर्व शिक्षक वृन्दात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान अधिक माहिती अशी की सध्या स्थितीला ऍडमिशन साठी शाळेत पालकांना बोलावले जात असून यातच काल या नामांकित इंग्लिश शाळेतील शिक्षक कोरोना बाधित आढळल्याने पालकासह शिक्षक वृन्दात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या शाळेत कोणतेही नियम अटी पाळण्यात येत नसल्याचे नागरिकांतून चर्चा सुरू असून या बाधित शिक्षकांच्या संपर्कात कोण कोण आले ?या भीतीने पालक व शिक्षक वृन्दात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
COMMENTS