अन् मांजराकाठ पोरखा झाला..

*



  • अन् मांजराकाठ पोरखा झाला...!*


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ,काँग्रेसचे ज्येष्ट नेते ,मांजरा काठच्या विकासाचे महामेरु डाँ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचे दुःखद निधन झाले.मांजरा नदीवरील गिरकचाळ येथे कोल्हापुरी बंधारा बांधुन या भागात सिंचनाच्या सुविधा केल्या.हा बंधारा आशिया खंडातला पहिला कोल्हापुरी बंधारा ठरला.शिवाय टाकळी कोल्हापुरी बंधारा ,भोपणी मध्यम प्रकल्प ,साकोळ मध्यम प्रकल्प याबरोबरच साठवण तलाव ,पाझर तलाव बांधुन शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांतीची स्वप्ने वास्तवात उतरवली.देवणी तालुका निर्मितीनंतर पंचायत समिती ,तहसिल कार्यालय ,आयटीआय काँलेज ,मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी वस्तीगृह अशा मोठ्या प्रशासकीय इमारती बांधुन तालुक्याच्या विकासाला चालना साहेबामुळेच मिळाली.साहेबांचे योगदान असलेल्या विकासाच्या आठवणी कायम चिरकाल राहतील.आदरणीय साहेबांना भावपुर्ण श्रध्दाजंली...💐


✍️



  • सतीश बिरादार 

  • तालुका पत्रकार संघ अध्यक्ष देवणी

  • महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ


टिप्पण्या