राष्ट्रीय वारकरी परिषदेच्यावतीने तहसिलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
धर्माबाद (अहमद लड्डा)
राष्ट्रीय वारकरी परिषदेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत माननीय मुख्यमंत्री महोदय यांना देण्यात आले
नामदेव महाराजांच्या वंशजावर पंढरपूर येथे दाखल झालेले खोटे खोटे गुन्हे परत घेणे,
पवित्र श्रावण महिन्यामध्ये गोकुळाष्टमी पासून पन्नास व्यक्तींना नियम आणि अटी राखुन भजन-कीर्तन करण्याची परवानगी द्यावी
झी मराठीवरील फू बाई फू या कार्यक्रमांमध्ये प्रसारित झालेल्या निलेश साबळे व इतर सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्रातील पवित्र कीर्तन परंपरेचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी
ध्वनी क्षेपणास्त्रा चा नियम मज्जिद आणि मंदिरासाठी सारखाच असावा
हरिभक्त परायण इंदुरीकर महाराजांवर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा
महाराष्ट्रातील सर्व तीर्थस्थळे व मंदिरे नियम व अटी राखून भाविकांसाठी उघडे करण्यात यावी
अशा व इतर मागण्या या निवेदनातून करण्यात आलेल्या त्या निवेदनावर हरिभक्त परायण बंडू गुरुजी पांगरीकर
तालुका अध्यक्ष राष्टिय वारकरी परिषद
पंडित राव कदम किशनराव कावडे ,साईनाथ महाराज कवडेकर ,वीरू महाराज, चंद्रकांत पाटील, गजानन कवडे,गणेश कल्याणकर यांच्या सह्या आहेत.
COMMENTS