नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील विश्व विकास शिक्षण प्रसारक मंडळ आंबुलगा (बु ) येथील शांती निकेतन विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली विद्यालयाचा यंदाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९७.४३ % लागला आहे .एकूण ३९ विद्यार्थ्यां पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ८ विध्यार्थी विशेष प्राविण्या सह उत्तीर्ण झाले आहेत तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.पुजा गोविंद आकुलवाड ८९ .८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे .तसेच भायेगावे वैष्णवी संभाजी ८४ टक्के गुण मिळवुन विद्यालयात द्वितीय आली आहे , यसगे उमा ८३.६० टक्के गुण मिळवुन विद्यालयात तृतिय ,प्रतिक्षा देविदास झाडे ८३.२० ,झाडे वैष्णवी हाणमंत ८१.४० ,सुर्यवंशी संतोष पंढरी ७७.२० ,क्यादरकुंठे शामल नरसिंग ७६ ,रूपाली राम मंत्रे ७५.६० गुण संपादन केले आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतिने (दि.४) रोजी विद्यालयात सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधाकरराव मामीलवाड , सौ .रामोड मॅडम , सौ.गोविंदवाड मॅडम , सुधाकर नारवाड सर , नागनाथ लगडे सर , आंधळे सर ,मारोती कांबळे सर ,सुभाष गुरूजी अंबुलगेकर , रमण काब्दे सर, अंतेश्वर चंदावाड सर ,डोंगळीकर सर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी एस.एस.सी. बोर्ड परिक्षेतिल गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व आभिनंदन केले ....
COMMENTS