पुन्हा लॉकडाऊन..काय चालू.. काय बंद.. 

नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे   लातूर:(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्...


नगरपालिका क्षेत्रात नियम शिथील तर महानगरपालिका क्षेत्रात जैसे थे


 


लातूर:(प्रतिनिधी) जिल्हाधिकारी लातूर यांनी १ ऑगष्ट ते १५ ऑगष्ट पर्यंत नव्याने आदेश काढला असुन, त्या दरम्यान चे काळात काय चालू व बंद असेल याबाबत सविस्तर माहिती खालील प्रमाणे.


 


लातूर शहर व लगतच्या काही गावांच्या (गंगापूर पेठ,चांडेश्वर ,खोपेगाव ,कव्हा,कातपूर ,बाभळगाव,सिकंदरपुर ,बसवंतपूर, खाडगाव,पाखरसांगवी, कोळपा,हरंगुळ बु, बोरवटी, मळवटी, वरवंटी,आर्वी, वासनगाव,हनुमंतवाडी, महाराणा प्रताप नगर) हद्दीत दिनांक १/८/२०२० ते १५/८/२०२० या कालावधीत खालील बाबी लागू राहतील व दिनांक १५/८/२०२० नंतरच्या कालावधीकरिता चे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.  


 



  • खालील सेवा बंद राहतील. 

  •  

  • भाजीपाला व फळाची ठोक व किरकोळ विक्री बंद राहील. 

  •  

  • ऑनलाइन पदार्थ मागवणारे खाद्यपदार्थ पुरवठा सेवा बंद राहील. 

  •  

  • उपहारगृह, बार ,लॉज ,हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद राहील. 

  •  

  • केश कर्तनालय ,सलुन, ब्युटी पार्लर दुकाने बंद राहतील. 

  •  

  • मटन चिकन अंडी मासे आदींची विक्री संपूर्णतः बंद राहील. 

  •  

  • शाळा, महाविद्यालय,शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था,शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद राहतील. 

  •  

  • सार्वजनिक व खाजगी वाहने दोन चाकी, तीन चाकी ,चार चाकी संपूर्णतः बंद राहतील. 

  •  

  • सार्वजनिक, खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो ,ट्रॅक्टर इत्यादी संपूर्ण बंद राहतील . 

  •  

  • धार्मिक स्थळे, सभा,समारंभ, प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद राहतील. 

  •  

  • लातूर शहरातील सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील. 

  •  

  • खालील प्रमाणे सेवा व सुविधा चालू राहतील. 

  •  

  • किराणा दुकाने व ठोक विक्रेते दुपारी बारा वाजेपर्यंत सुरू राहतील. 

  •  

  • दूध विक्री व वितरण सकाळी दहा वाजेपर्यंत घरपोच पोहोच करणे सुरू राहील. 

  •  

  • खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा व पशुचिकित्सा सेवा नियमित वेळेत सुरू राहतील. 

  •  

  • ऑनलाइन औषध वितरण सेवा व दवाखान्यात बाबत असलेली औषध विक्री दुकाने ३१/ ७ /२०२० पर्यंत २४ तास सुरू ठेवता येतील, इतर ठिकाणी असलेले मेडिकल दुकाने ३१/ ७ /२०२० पर्यंत सकाळी ७ ते दुपारी बारा या कालावधीत सुरू ठेवता येतील. 

  •  

  • पेट्रोल पंप व गॅस पंप सुरू राहतील ,अत्यावश्यक सेवा साठी या सुविधा उपलब्ध राहतील. 

  •  

  • वर्तमान पत्राचे वितरण सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये अनुज्ञेय राहील. 

  •  

  • बी-बीयाणे आणि शेतीसाठी लागणारी औषधे सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. 

  •  

  • अंत्यविधीसाठी वीस व्यक्ती च्या उपस्थितीस परवानगी असेल. 

  •  

  • शेतीच्या मशागतीसाठी मुभा असेल. 

  •  

  • स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील.

  •  

  • महत्वाचे 

  •  

  • नगरपालिका /नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २० पर्यंत सकाळी ७ ते सायं. ७ पर्यंत सर्व दुकाने, भाजीपाला, इतर आस्थापने चालू असतील.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel