महसूल दिनापासून डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा होणार उपलब्ध  महसूल मंत्री मा. ना. बाळासाहेब थोरात यांचे शुभहस्ते शुभारंभ 


- महसूल विभागाच्या महाभूमी प्रकल्पा अंतर्गत ई फेरफार कार्यक्रमा अंतर्गत डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा (गाव नमुना नं.८ अ ) आत्ता ही आणखी एक नवीन सुविधा उद्या दिनांक १ ऑगस्ट पासून सुरु केली जात आहे. त्याचा शुभारंभ मा.ना. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री यांचे शुभ हस्ते महसूल दिनी ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. महाभूमी पोर्टल वर संगणकीकृत अभिलेखापैकी फक्त सातबारा डिजिटल स्वाक्षरीने जनतेला डाऊनलोड साठी उपलब्ध होता आत्ता त्यासोबतच डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा देखील मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा सोबतच खाते उतारा देखील आवश्यक असतो त्यामुळे महसूल विभागाने ख्स्ते उतारा देखील तलाठी यांचे डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे 


- महसूल विभाग दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन उत्साहाने साजरा करतो परंतु यावर्षी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे महसूल दिन साध्या पद्धतीने व सर्व निर्बंध पाळून साजरा करण्याचे निर्देश अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर यांनी दिले आहेत त्यामुळे हा शुभारंभ देखील ऑनलाईन पद्धतीने होत आहे. यावेळी महसूल राज्य मंत्री ना. अब्दुल सत्तर , अप्पर मुख्य सचिव महसूल डॉ. नितीन करीर, जमाबंदी आयुक्त श्री. चोक्कलिंगम, सह सचिव महसूल श्री. संतोष भोगले व राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र पुणे येथील तंत्रज्ञ , सर्व विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी व ई फेरफार प्रकल्पाचे जिल्ह्याचे समन्वयक उप जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. 


रामदास जगताप 


उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक 


ई फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे


टिप्पण्या
Popular posts
डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव : समर्पित प्राध्यापिका*
इमेज
फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या गृहविभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीला टांगणारी..गृहखाते झेपत नसेल तर राजीनामा द्या: हर्षवर्धन सपकाळ
इमेज
सेलू येथे शालेय विभागीय कबड्डी क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न* *गांधी विद्यालय परभणी मनपा विजयी*
इमेज
विकसित महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्याचे आढावा बैठक संपन्न
इमेज
बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या लाडकी बहीण ठेव योजनेचा सांगता सोहळा संपन्न*
इमेज