चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले


 


केज प्रतिनिधी :- केज तालुक्यातील बोरगाव येथून एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस गावातील एका युवकाने फूस लावून पळवून नेले आहे या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या बाबतची माहिती अशी की, दि. ५ ऑगस्ट रोजी रात्री २:०० वा. च्या सुमारास केज तालुक्यातील बोरगाव येथून एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गावातील किशोर नवनाथ आरकडे हा युवक मोटार सायकलवर बसवून फूस लावून पळवून घेऊन गेला आहे. जाताना मुलीने घरातील मोबाईल व स्वतःचे कपडे सोबत नेले आहेत. या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशनला संशयित आरोपी किशोर नवनाथ आरकडे याच्या विरोधात गु.र.नं. ३०४/२०२० भा.दं.वि. ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.


--------------------------------------


टिप्पण्या