*8ऑगस्ट ते 13 ऑगस्ट कडकडीत बंद*
*केज शहर व तालुक्यातील लहान मोठे व्यापारी बांधव आणि नागरिकानो,*
गेली एक आठवड्यापासून केज शहर व परिसरात कोरोना विषाणूचा फैलाव व रुग्ण संख्या प्रचंड वेगाने वाढू लागलीय. ही बाब आपल्या सर्वांसाठी खूप धोक्याची आहे. मित्रानो ज्या काळात आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात एकही रुग्ण नव्हता त्या काळात आपण आपले व्यवसाय बंद ठेवून घराबाहेर पडलो नाही आणि आज संकट दारात व घरात शिरले असताना आपण गाफील आहोत. शहरात एका नागरिकांच्या रुपात पहिला कोरोना बळी गेला आहे. अशा वेळी घाबरण्याची किंवा भीती बाळगायची अजिबात गरज नाही मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.
प्राप्त गंभीर परिस्थिती पाहता हा उद्रेक किमान थांबवण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी आपल्या केज शहरातील व्यापाऱ्याची 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता व्यापारी महासंघाचे तालुका अध्यक्ष मा महादेवराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व इतर व्यवसाय विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बैठक बोलावली होती.
त्यानुसार येत्या शनिवार दि 8 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या काळात केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा व शासकीय सेवा वगळता किराणा, भाजी-फळविक्रेते यांच्यासह सर्व बाजारपेठ सहा दिवस कडकडीत बंद राहणार आहे. या काळात कोणीही व्यापारी बांधव किंवा विक्रेता याने आपले दुकान उघडले किंवा गुपचूप वस्तू विकताना कोणाचीही पुराव्यानिशी किंवा फोटो व व्हिडीओ सह तक्रार आल्यास संघटना व प्रशासन कठोर कार्यवाही करून दंड आकारणार आहेत.
हा स्वयंस्फूर्त जनता बंद आहे ज्यात प्रशासन मदत करणार आहे. कृपया ही बाब कोणीही सक्ती किंवा जबरदस्ती समजू नये..आपल्या व कुटुंबाच्या आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी ही बाब गरजेची आहे...तरी आपण सर्वांनी या बंद ला संपूर्ण पाठिंबा देऊन पूर्णतः यशस्वी करावा...
COMMENTS