*
*प्रवीण देशमुख यांनी मुख्यद्यापक पदाचा पदभार स्विकारला*
*" शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय्य "*
--- प्रवीण देखमुख, मु.
रमेश इतापे/केज :-
*छत्रपती शिक्षण संस्था आडस संचालित शंकर विद्यालय केजच्या मुख्यद्यापकपदी प्रवीण देशमुख यांची निवड झाली असून प्रवीण देशमुख सर यांनी दि.४ ऑगस्ट रोजी पदभार स्विकारला. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.*
साळेगाव ता. केज येथील शंकर विद्यालय साळेगावचे मुख्यद्यापक राम राऊत हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या जागेवर प्रवीण देशमुख यांनी निवड झाली आहे. त्या निमित्त दि.४ ऑगस्ट रोजी प्रवीण देशमुख यांनी आपल्या पदाचा पदभार स्विकारला.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित मुख्याद्यापक प्रवीण देखमुख म्हणाले की, शाळेची गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जा सुधारणे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी दिवंगत बाबूरावजी आडसकर, मेघराज आडसकर त्यांचे कायम स्मरण ठेवून मला या पदावर काम करण्याची संधी देणारे आमच्या संस्थेचे सचिव मा. रमेशरावजी आडसकर साहेब यांचा ऋणी आहे. अशी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी शाळेच्या वतीने वसंत शिक्षक- शिक्षकेत्तर सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सय्यद अकबर पटेल यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले. या वेळी निवृत्त मुख्याद्यापक राम राऊत, राजकुमार गित्ते, नखाते सर, गोविंद मेहेत्रे, शहाजी तांबारे, सुरेंद्र घोडके, अनिल पत्रावळे, किशोर मेहेत्रे, प्रताप केंद्रे, देशमुख सर, घुलें मॅडम, शेख रफिक, बळीराम मुंडे, मोहिते, अतुल रोडगे यांच्यासह पालक उपस्थित होते.
COMMENTS