नांदेड प्रतिनिधी
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबा नगर नांदेड येथील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल मारोती कांबळे हिने मार्च 2020 च्या बोर्ड परीक्षेत 500 पैकी 500 गुण म्हणजेच 100 टक्के गुण प्राप्त केले. यानिमित्ताने संस्थेचे सन्माननीय सचिव श्री डी. पी.सावंत साहेब यांनी स्नेहल चा यथोचित सत्कार व सन्मान केला . याप्रसंगी सहसचिव श्री उदयरावजी निंबाळकर साहेब , संस्थेचे सन्माननीय खजिनदार श्री डॉ. रावसाहेब शेंदारकर साहेब, ,संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री नरेंद्र दादा चव्हाण साहेब , तसेच स्नेहल चे आईवडील आणि शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री पी.आर. कानडे, पर्यवेक्षक श्री व्ही. एन. देवसरकर , वर्गशिक्षक श्री एस. व्ही. जाधव, श्री एम आर मुत्तेपवार, श्री एस जी केंद्रे ,श्री एच. एम. साखरे ,श्री के आर सय्यद व इतर मान्यवर उपस्थित होते
ही
COMMENTS