भारतीय जनता पार्टी धर्माबाद च्या वतीने राज्यव्यापी महाएल्गार रास्ता रोको आंदोलन   


धर्माबाद-तालुका प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांच्या "गाईच्या दुधाला सरसगट दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे व दूध पावडर ( भुक्टीला) निर्यातीला प्रति किलो पन्नास रुपये एवढा अनुदान देन्यात यावे तसेच दूध खरेदीचा दर प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे करन्यात यावे या तीन प्रमुख विषयासाठी भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस मा.श्रावण पा. भिलवंडे यांच्या नेतृत्वाखाली धर्माबाद येथे भाजपा ने आज 1अगस्ट रोजी आंदोलन करून तहसीलदार दत्तात्रय शिंदे यांच्या कडे निवेदन सादर केले.   


यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राम पाटील, रविंद्र पोतगंटीवार,नगरसेवक संजय पवार ,दताहरी पाटील आवरे,संजय पाटील रामपुरे, ललेश पाटील मंगनाळीकर, शहर अध्यक्ष रामेश्वर गंधलवार,आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. ११:०० वा सकाळी धर्माबाद बासर रस्ता उपविभागीय पोलीस कार्यालया पुढे व धर्माबाद कारेगाव रस्ता रेल्वे गेट क्रमांक 2 च्या समोर ११:३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आंदोलनात सहभागी भाजपा कार्यकर्त्यांनी सामाजिक आंतर व कोरोना चे निकष पालन करून प्रशासनाकडे निवेदन दिले.


भाजपा प्रदेश कार्यालयाच्या वतीने आलेल्या आदेशानुसार जिल्हाभर हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती अभियान जिल्हाप्रमुख श्रावण पाटील भिलवंडे यांनी दिली


टिप्पण्या