*फरतड कापूस घेऊन मोठी आर्थिक उलाढाल

*शासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी?मार्केट,जिनिंग,ग्रेडर,दलाल,व्यापारी?*


सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी


शासनाने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सुरु केलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र कोणाच्या फायद्यासाठी असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.सोनपेठ तालुक्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शासकीय कापूस खरेदी केंद्र अर्थात फेडरेशन सोनपेठ तालुक्यातील करम येथे मंजूर करून सदर केंद्र कार्यान्वित करण्यात आले खरे!मात्र या कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून तुरळक शेतकरी वगळता सर्व फायदा झाला कोणाचा असा सवाल उपस्थित होऊ लागला असून पांढऱ्या कपड्यातील बगळ्यांनी स्व:तचे उखळ पांढरे करत जिनिंगचालकाचे चांगभले चालवल्याची चर्चा सर्वस्तरात होऊ लागली आहे.खऱ्या शेतकऱ्यांच्या कापसाची सत्यता तपासताना ग्रेडरने आपले उखळ पांढरे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून.यामुळे शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली तर व्यापाऱ्यांच्या मालाचा दर्जा ठरवतांना मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे.शेतकऱ्याला न्याय देण्याच्या भावनेतून व्यापाऱ्यांना न्याय तर शेतकऱ्यांवर अन्याय हे गमक वापरून जिनिंगचालकांनीही हात काळे केल्याची चर्चा सर्वत्र होत असून ६ ऑगस्ट रोजी फेडरेशनच्या शेवटच्या दिवसाची संधी साधुन मोठ्या प्रमाणात खराब कापसाचा चांगला दर्जा ठरवत आपले उखळ पांढरे केल्याचे प्रकार समोर येत आहेत.


टिप्पण्या