निष्टुरतेचा कळस!पोलीस तपासातून न्यायाची अपेक्षा* *विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पतीसह सासू सासऱ्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल*

■ सोन व पैशासाठी गर्भवती सुनेला जीवे मारले ■आचार्य टाकळीच्या घटनेने माणुसकी हरवल्याचा प्रत्यय सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी परळी तालुक्यातील आचार्य...


■ सोन व पैशासाठी गर्भवती सुनेला जीवे मारले


■आचार्य टाकळीच्या घटनेने माणुसकी हरवल्याचा प्रत्यय


सोनपेठ/सिद्धेश्वर गिरी


परळी तालुक्यातील आचार्य टाकळी येथील विवाहिता मनीषा जगन्नाथ आचार्य (वय२२) या विवाहीतेला बुधवार दि ५ रोजी घरातच सासु,सासरा व नवऱ्यानी मारून टाकत औषध पिल्याचा बेबनाव करत असल्याच्या प्रकाराने माणसातील माणुसकी हरवल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.याबाबत अधिक माहीती अशी की,परळी तालुक्यातील पाडोळी येथील मनोहर काळे यांच्या मुलीचा विवाह १४ महीन्यापूर्वी आचार्य टाकळी येथील संदीपान आचार्य यांचा मोठा मुलगा जगन्नाथ याच्याशी मोठ्या थाटामाटात पार पडला होता.जावई पाथरी येथील फार्मसी कॉलेजमध्ये नोकरीस असल्याने त्यास हुंडाही मोठ्या प्रमाणात दिला गेला.लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच मनीषा हीला कार घेण्यासाठी वडिलांकडून २ लाख रुपये घेऊन ये म्हणत सासरी छळ सुरू झाला तसेच लग्नात सासूला सोन्याची अंगठी का घातली नाही.म्हणून पतीसह सासू,सासरा घरी मारहाण करीत होते.मुलगी मनीषा हीने हा सर्व प्रकार माहेरी कळवला होता.पंचमीसाठी माहेरी गेल्यास मनीषाने सासरी जाच होत असल्याने आता परत जायचे नाही या विचारातून तीने माहेर गाठले खरे!मात्र समाजातील प्रतिष्ठा राखण्यासाठी माहेरी समजूत घातल्यानंतर ती पुन्हा टाकळी येथे तीच्या सासरी गेली माहेरहून लवकर का आली नाहीस या कारणाने त्याच रात्री नवऱ्याने कमरेच्या कमरेच्या बेल्टने पुन्हा मारले होते.


बुधवार ५ऑगस्ट रोजी सकाळी जावयाच्या भावकीतील एकाने मनोहर काळे यांना तुमच्या मुलीची प्रकृती बरोबर नसल्याची माहीती काळे यांना दिली असता.तासाभराच्या आत वडील व इतर काही जण टाकळी येथे तीच्या घरी पोहचले त्यावेळी मनीषास खाली फरशीवर टाकल्याचे त्यांना दिसून आले.हे काय केल अस संदीपान आचार्य यांना विचारले असता मनीषा हिने विषारी औषध प्राशन रून आत्महत्या केली असल्याचे त्यांना सांगण्यात आले.दरम्यान पैसे व सोन्याच्या अंगठीसाठीच नवऱ्यासह सासू सासऱ्यानी संगनमत करून मनीषा हीस जिवंत मारून टाकल्याची फिर्याद मनोहर काळे यांनी पोलिसांत दिली.सासरकडील तिघा जणांविरुद्ध सिरसाळा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जनक पुरी हे करत आहेत.


*20 तासां नंतर अंत्यसंस्कार*


अंबाजोगाई स्वा.रा.ती.रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह सरळ पोलीस ठाण्यात आणण्यात आला.सासरच्या मंडळीवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत येथून हालणार नाही असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता.सिरसाळा पोलिसांनी 


योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माहेरी पाडोळी या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.तोपर्यंत सर्व गाव जागेच होते.मनीषा ही तीन महिन्यांची गर्भवती असल्याने गावात सर्वजण हळहळ व्यक्त करीत आहेत.दरम्यान मनोहर साहेबराव काळे यांच्या फिर्यादीवरून पती जगन्नाथ संदीपान आचार्य,सासरा संदीपान आश्रोबा आचार्य,सासू संजीवनी संदीपान आचार्य,या तिघाविरुद्ध हुंडाबळी कायद्यासह मनुष्य वधाच्या कलमाखाली सिरसाळा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.दरम्यान या निष्ठुरतेने माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असल्याचा प्रत्यय आलेला आहे पोलीस तपासात न्याय मिळण्याची अपेक्षा मनीषा हीच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel