*स्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त प्रशालेस K-YAN मशिन भेट*


सेलू (प्रतिनिधी)येथे नूतन कन्या प्रशाला येथेस्व.सौ.दुर्गाताई द.कुलकर्णी यांच्या तृतीय पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया, प्रमुख पाहुणे माजलगाव येथील ज्येष्ठ साहित्यीक तथा साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते प्रभाकर सालेगावकर, संस्थेचे सचिव डि. के.देशपांडे, सहसचिव डॉ.व्ही.के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, कार्यकारणी सदस्य पावडे नाना, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापिका सौ.संगिता खराबे, उपमुख्याध्यापक दत्ता घोगरे आदि उपस्थित होते.  नूतन संस्था माजी सचिव तथा प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांच्या वतीने स्व.सौ.दुर्गा ताई कुलकर्णी यांच्या स्मृति दिनाच्या निमित्ताने के यान मशिन देण्यात आली. मुख्याध्यपिका सौ.संगिता खराबे यांनी ग्रंथालयाविषयी माहिती आपल्या प्रास्ताविक भाषणात नमूद केली.


या प्रसंगी प्रशालेच्या ग्रंथालयाच्या वतीने स्व.सौ. दुर्गाताई यांच्या कार्याविषयीची माहिती विध्यार्थिनींना व्हावी म्हणून त्यांच्या नावानेच सुरु असलेल्या "दुर्गाई" या भित्ति पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.


या प्रसंगी प्रमुख पाहुणे यांनी आपल्या भाषणात वाचन संस्कृती वाढवी म्हणून  विद्यार्थिनी पर्यन्त पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे.वाचनाचे महत्व पटवून दिले पाहिजे, वाचनामुळे मन प्रसन्न होते त्याच बरोबर मनाचा विकास होऊन मन सशक्त होते. वाढदिवसानिमित्त खाऊ ऐवजी किमान एक पुस्तक ग्रंथालयास भेट दिले पाहिजे. वाचन संस्कृती जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. स्व.सौ.दुर्गाताई यांचे कार्य अधिकाधिक विद्यार्थिनीं, लोकांपर्यंत गेले पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांनी एक छानशी कविताही सादर केली.


संस्थेचे सहसचिव डॉ.व्ही. के.कोठेकर यांनी आपल्या मनोगतात वाचन संस्कृती वाढवी म्हणून सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे. विध्यार्थिनींना जास्तीजास्त पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे असे मत व्यक्त केले.


या प्रसंगी ग्रंथपाल शिवाजी शिंदे यांनी शहरातील ग्रंथप्रेमी नागरिकांना भेटून त्यांना वाचनाचे महत्व पटवून त्यांच्याकडून विद्यार्थिनीसाठी रु.३५०००/- रक्कमेची एकूण ३३१पुस्तके घेऊन ग्रंथालयास उपलब्ध करून दिली. तसेच प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनींनी विध्यार्थिनींना वाचण्यासाठी आवश्यक  चांदोबा, किशोर, मुलाचे मासिक, छोटी छोटी मासिके उपलब्ध व्हावी म्हणून पूर्ण एक वर्षाची पूर्ण वार्षिक वर्गणी गोळा करून दिली.


अध्यक्षीय भाषणात डॉ.एस.एम.लोया यांनी प्रमुख पाहुणे यांनी व्यक्त केलेल्या सूचना, मत यांचा विचार करून त्यांनी जे काही उपक्रम सांगितले. ते उपक्रम ग्रंथपालानी आपल्या शाळेत राबविण्यात यावे. त्याच बरोबर ग्रंथालयाच्यावतीने अनेक उपक्रम राबविले जातात याचे कौतूक त्यांनी केले.


कार्यक्रमासाठी महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ललिता गिल्डा व महिला वर्ग उपस्थित होत्या. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू नूतन महाविद्यालयातील प्राध्यापक ढेकळे यांनी पहिले. सूत्र संचालन ग्रंथपाल शिवाजी शिंदे व सौ.हेमलता देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक दत्ता घोगरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व  शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.


टिप्पण्या