भाजपच्या पाठपुराव्याला यश - बबनराव सोळंके
माजलगाव/प्रतिनिधी
ऊसाची तोड झाल्यावर 14 दिवसात FRP ची रक्कम शेतकऱ्यांना देणे कायद्याने बंधनकारक असूनही 7 महिन्या पेक्षा जास्त दिवस होऊनही गळीत हंगाम 2019-2020 मधील गाळप केलेल्या ऊसाची पूर्ण FRP रक्कम न देणाऱ्या तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्या विरोधात तालुका भाजपच्या वतीने साखर आयुक्त यांच्याकडे निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.याची दखल घेत सुंदरराव सोळंके साखर कारखान्याने उसाचे थकित बील शेतकऱ्यांना वर्ग केले आहे,अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष बबनराव सोळंके यांनी प्रसिध्दी पत्रकद्वारे दिली आहे.
भाजपच्या वतीने 11 जुलै रोजी साखर आयुक्त पुणे व प्रादेशिक साखर सहसंचालक औरंगाबाद यांना लेखी निवेदन देऊन थकीत ऊस बील न देणाऱ्या तेलगाव साखर कारखान्या विरूद्ध कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेऊन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव यांनी थकीत FRP च्या रक्कमेची ऊस बिले संबधित शेतकऱ्यांना आज दि.8 ऑगस्ट 2020 रोजी बँकेच्या खात्यात वर्ग केली आहेत.सत्ता असो किंवा नसो भाजप सतत शेतकरी वर्गाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.हे भाजपने दाखून दिले आहे.ऊस बील मिळाले असले तरी
अद्याप ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार 15 टक्के विलंब व्याज व 250 ते 300 रुपये एफआरपी मिळणे सदर कारखान्याकडे बाकी असून त्यासाठी साखर आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे,अशी माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष बबनराव सोळंके यांनी दिली आहे.
COMMENTS