नांदेड :- जिल्ह्यात रानभाजी महोत्सव आज सकाळी १० वाजल्यापासून जिल्हाीधिकारी कार्यालय परिसर नांदेड साजरा केला जाणार आहे. कोवीड-१९ च्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन येथे कंदभाज्या, सेंद्रीय हिरव्यााभाज्या, फळभाज्या, फूलभाज्या् रानफळांचे प्रदर्शन व विक्री होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे.
या महोत्सीवात शेतकरीगट व महिलागटांचा सहभाग असणार आहे. या विक्रीच्या ठिकाणी उपलब्ध, होणाऱ्या रानभाज्यामध्ये कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुईआवळी इत्यादी कंदभाज्या व सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फुलभाज्या व रानफळांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
मानवी आरोग्यासाठी सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नादमध्ये विविध रानभाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीमध्ये रानातील, जंगलातील व शेतशीवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्याक आहे. रानभाज्यांंचा समावेश हा त्या- त्या भागातील शेतकऱ्यांच्या आहारात होत असतो.
रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्यात येत नाही. पुर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीतचा योग्य वापर आवश्यक आहे. शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यपक आहे. यासाठी जिल्ह्यात हा रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे
COMMENTS