बीड – जिल्ह्यातील सर्वच बँकांनी पीककर्ज वाटपाचा वेग वाढवावा, किरकोळ कारणांवरून बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये; सीबील क्रेडिट कडे सहानुभूतीपूर्वक पाहिले जावे यासह उद्या (दि.१२) पासून लागू होत असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम पीककर्ज वाटपावर होऊ नये यादृष्टीने काम करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. केवळ उद्दिष्टपूर्तीचा विचार न करता कर्जमाफीचा लाभ मिळवून पात्र असलेले व नव्याने पात्र असलेले अशा सर्वच शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात यावे असे यावेळी मुंडे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सर्व प्रमुख बँकांच्या प्रमुख अधिकारी/प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या सूचना मुंडे यांनी दिल्या आहेत. यावेळी आ. प्रकाश सोळंके, आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, शिवाजी सिरसाट, यांसह जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक तसेच सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी
COMMENTS