============================== कंधार कोरोना संकटकाळात घरीच लाॅकडाऊन राहिल्याने वेळ भरपुर मिळाला त्या वेळेचा उपयोग करत आपल्या सृजनशीलते...
==============================
कंधार
कोरोना संकटकाळात घरीच लाॅकडाऊन राहिल्याने वेळ भरपुर मिळाला त्या वेळेचा उपयोग करत आपल्या सृजनशीलतेस चालना देत घरात असलेल्या माध्यमांचा वापर करुन बर्फाळ प्रदेशात वास्तव्यास असलेली पेंग्विन पक्ष्यांची जोडी तयार करतांना मनी आनंदाला उधाणच आले.या लाॅकडाउनच्या कालखंडात जवळपास 15/20 कलाकृती साकारता आल्या.त्यामुळे वेळ कला करतांना खर्चीला गेला.
आपल्या कला-कौशल्याने ओळखली जाणारी सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांनी आज पर्यंत अनेक कलाकृती साकारुन आपली ओळख निर्माण केली.या वर्षी येत असलेल्या गौरी-गणपतीच्या सणा निमित्य पेंग्विन पक्षाची जोडी तयार केली.ही कला सारतांना कोरोना संकटकाळी घरीच सुरक्षित राहिल्याने वेळेचा सदउपयोग करतांना ही कला निर्मिती झाली.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार
COMMENTS