माजलगाव/प्रतिनिधी
शहरात कोरोना विषाणू चा वाढता संसर्ग लक्षात घेता या जैविक युद्धाचा सामना करण्यासाठी व नागरिकांची रोग प्रतिबंधात्मक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अँड विश्वजीत देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त माजलगाव येथे 300 गरजू व्यक्तींना अर्सनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करण्यात आले. कुठलीही बॅनरबाजी न करता हारेतुरे ,केक वर खर्च न करता सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्याचे आव्हान त्यांनी केले त्यामुळे माजलगाव येथे अर्सनिक अल्बम 30 गोळ्याचे वाटप करून सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला .अँड विश्वजीत देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परशुराम सेवा संघातर्फे वर्षभर सामाजिक कार्यक्रम हे चालूच असतात मग ते गुरजु व्यक्तींना आर्थिक मदत असेल गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असेल सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान असेल समाज प्रबोधनाचे कार्यक्रम असतील असे विविध उपक्रम चालूच असतात अशा सामाजिक क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या व्यक्तीचा वाढदिवस ही सामाजिक उपक्रमांनी साजरा केला पाहिजे व त्यांनी दिलेल्या आवाहनाचे सर्वानी पालन करावे असे मत नगरसेवक परशुराम सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक रत्नपारखी यांनी केले. दुर्दैवाने किंवा निष्काळजीपणामुळे जर कोरोनाच्या आजाराने आपल्या शरीरावर आक्रमण केले तर आपण याच्यावर मात हे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून यावर मात करू शकतो त्यामुळे अर्सनिक अल्बम गोळ्याचे सेवन केल्याने मात होते हा उद्देश लक्षात घेऊन गरजू लोकांना अर्सनिक अल्बम 30 या गोळ्याचे वाटप करण्याचे ठरवले. यासाठी डॉक्टर आनंद लोढा यांनी अल्पदरात आर्सेनिक अल्बम 30 च्या गोळ्या देऊन सहकार्य केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष एपी कुलकर्णी सर दत्ताजी महाजन राजू रत्नपारखी स्वानंद नाईक कैलास जोशी राजू गुंजकर केदार वाघमारे गौरीताई देशमुख राजश्री आनंदगावकर कल्याणी जाब्रस वैशाली वाघमारे विभा उपाध्य सह परशुराम सेवा संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सोशल डिस्टन्स चे पालन करत हा कार्यक्रम संपन्न झाला.
COMMENTS