साळेगाव येथे कंटेनमेंट झोन घोषित


-------------------------------------------


रमेश इतापे/केज :- केज तालुक्यतील साळेगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे साळेगाव येथे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून सर्व व्यवहार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.


 


केज तालुक्यतील साळेगाव येथे पस्तीस वर्षीय युवक हा कोरोना संसर्गित आढळूनआला आहे. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश क्र . १४ अन्वये दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ ( १ ) ( ३ ) लागू करण्यात आले आहेत. ज्याअर्थी , केज तालुक्यातील साळेगांव येथे कोरोना विषाणूची लागण ( covid - 19 Positive ) झालेला रुग्ण आढळुन आलेला असल्याने केज तालुक्यातील साळेगांव येथे प्रतिबंधात्मक व्यवस्था अंतर्गत Containment zone जाहीर करावा. असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी संदर्भ १५ अन्वये सादर केला आहे . त्याअर्थी , बीड जिल्हयात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पुढील प्रमाणे फौजदारी प्रकिया दंड संहीता १ ९ ७३ चे कलम १४४ १) (३) नुसार केज तालुक्यातील साळेगांव हे गांव व परिसर Containment zone म्हणून घोषित करण्यात येत असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात येत आहे. असा आदेश दिनांक ०३/०८/२०२० रोजी निर्गमित करण्यात आले आहेत.


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज