तालुका कृषी अधिकारी,केज कार्यालयात शेतकरी दिन संपन्न*

*


 


पद्मश्री श्री.विठ्ठलराव विखे पाटील व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त तालुका कृषी अधिकारी,केज कार्यालयात शेतीदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरच्या कार्यक्रमात उद्यान पंडित श्री.रमेश सिरसाट (रा.आरणगाव) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या शेतीदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील ईतर गावांमध्ये सुद्धा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.


यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ,श्री.सिरसाट यांनी स्वतःच्या शेतामध्ये केलेली फळबाग लागवड व ड्रॅगनफ्रुट लागवड बाबतचे अनुभव व्यक्त केले.


तालुका कृषी अधिकारी श्री.देशमाने साहेब यांनी शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून स्वतःला तसेच ईतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटून निश्चित स्वरूपाचा फायदा होतो व त्यातून शेतकऱ्यांची प्रगती साधता येते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.


यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री.अंभोरे साहेब,एल.व्ही.गायकवाड,सचिन साखरे व आत्मा कर्मचारी यांची उपस्थिती होती.


टिप्पण्या