*किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर* *9 ऑगस्टला होणार सुरुवात*

---------------------------------------- *किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर*   *9 ऑगस्टला होणार सुरुवात* ■ *200 हून अधिक शिबिरार्थी होणार सहभागी* ...


----------------------------------------


*किसानपुत्रांचे ऑनलाइन शिबिर*


 


*9 ऑगस्टला होणार सुरुवात*


■ *200 हून अधिक शिबिरार्थी होणार सहभागी*


पुणे-


किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 'शेतकरीविरोधी कायदे' या विषयावर 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन शिबिर आयोजित करण्यात आले असून त्यात दोनशे हून अधिक शिबिरार्थींनी नावे नोंदवली आहेत अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी दिली. 


 


हे शिबिर गुगल मीट वर दररोज सायं 5 ते 6.30 या वेळात होईल. 'चपराक'चे संपादक घन:श्याम पाटील हे शिबिराचे उदघाटन करणार असून अमर हबीब हे समारोपाचे व्याख्यान देणार आहेत.


 


या शिबिरात डॉ. विकास सुकाळे (नांदेड) हे सिलिंग कायदा, ऍड भूषण पाटील (औरंगाबाद) आवश्यक वस्तू कायदा, नंदकुमार उगले (नाशिक) जमीन अधिग्रहण कायदा समजावून सांगतील. परिशिष्ट 9 व अन्य शेतकरीविरोधी घटनांदुरुस्त्या बद्दल ऍड महेश गजेंद्रगडकर (पुणे) हे विवेचन करणार आहेत. तसेच संदीप रोडे (अमरावती) हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची रणनीती अर्थात किसानपुत्र आंदोलन या वर बोलतील. समारोप सत्रात सर्जकांचे स्वातंत्र्य या विषयावर अमर हबीब मार्गदर्शन करणार आहेत.


 


मयूर बागुल (अंमळनेर-पुणे) हे शिबिराचे संयोजक असून तांत्रिक सहयोग असलम सय्यद (आंबाजोगाई-पुणे) करणार आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यातुन शिबिरार्थींना भाग घेतला आहे.  


 


■ लॉकडाऊनच्या काळात किसानपुत्र आंदोलनाने एक महिन्याची व्याख्यानमाला चालवली तसेच एक अनोखी व्हिडीओ स्पर्धाही घेतली. त्या पाठोपाठ ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel