.
परभणी ( प्रतिनधी )पाथरीचे मा. आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर येत आहे. बाजानी दुर्राणी यांनी औरंगाबादच्या एका रुग्णालयात रॅपिड एंटीजन टेस्ट दिली आहे.
त्यात तिचा प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती मिळत आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला जात आहे.
औरंगाबाद येथील एका रुग्णालयात शुक्रवारी रात्रीच्या वेळेला ते पोहोचले होते आणि त्या ठिकाणी त्यांची चाचणी करण्यात आली या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे असे सांगण्यात आले
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रशासनाच्या वतीने सर्व त्या खबरदारी उपाययोजना हाती घेतल्या असून यांच्या संपर्कात आलेल्या सर्व जणाना सुरक्षित केले जाणार आहे
परभणी जिल्ह्यातील किंबहुना ज्या ठिकाणाहून त्यांच्या संपर्कात आलेले काही व्यक्ती असतील त्यांनी प्रशासनाची संपर्क साधावा असे आवाहन देखील करण्यात येण्याची शक्यता आहे.
COMMENTS