सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील उखळी(बु.)येथील महात्मा कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ च्या शैक्षणिक वर्षे २०१९-२० चा निकाल नुकताच लागला असून या निकालाची एकूण सरासरी ८५%आली आहे.समता ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय चालवले जाते उच्च गुणवत्ता व विशेष अभ्यास या ध्येयातून संस्थासचिव गौतम मुजमुले यांनी संस्था ही संस्था उभारली असून तालुक्यात ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण व्हावी या ध्येयाने सदर संस्थेने २०१४ पासून सुरुवात केली आहे.या शैक्षणिक वर्षात २१४ विद्यार्थ्यांपैकी १८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात विज्ञान शाखेचा ७६%निकाल लागला आहे.तर कला शाखेचा ८८% निकाल लागला आहे.यात विज्ञान शाखेतून मेघराज बालाजी बुलबुले यांने ९१%गुण मिळवून प्रथम क्रंमाक मिळवला तर कला शाखेतून प्रियंका प्रकाश रासवे हीने ८१%गुण मिळवत प्रथम आली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सरपंच विमल सावंत,अध्यक्षा सारीका सावंत,सचिव गौतम मुजमुले,प्राचार्य वैजनाथ राठोड यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS