,लातूर मौजे हरंगुळ(बु.) ता. लातूर येथिल तलाठी उत्तम दत्ताञय बोयणे यास त्याच्या खासगी कार्यालयात काम करणारे दोन खासगी नोकर असे तिघांना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग लातूरच्या पथकाने एक हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
हरंगुळ येथिल तक्रारदार यांचे अाईचे फ्लाॅटची नोंद घेण्यासाठी तलाठ्याने दोन हजाराची मागणी केली तडजोड झाली व एक हजार स्विकारत असताना अाज दुपारी खोरी गल्ली लातूर येथिल तलाठ्याचे खासगी कार्यालयात लाचेच्या रकमेसह खासगी व्यक्ती विश्वनाथ शिवबसप्पा पञिके,राकेश मारोती राठोड तलाठी उत्तम बोयणे या तिघांना पकडण्यात अाले.पोलिस उपअधिक्षक माणिक बेद्रे, पोलिस निरिक्षक कुमार दराडे,बाबासाहेब काकडे व त्यांचे टिमने ही कारवाई केली.तलाठ्यास लातूर सारख्या शहरात स्वताचे पैशातून कार्यालय परवडते का?दोन दोन नौकरांना पगार कोठून देतात.तहसिल कार्यालयासी त्यांचे संबंध असतात का? असे अनेक प्रश्न उपस्थित कूले जात अाहेत.
COMMENTS