>भारतीय जनता पार्टी नांदेड, धर्माबाद च्या वतीने १ आॅगस्ट २०२० रोजी राज्यव्यापी महाएल्गार रास्ता रोको आंदोलन* 

 



धर्माबाद (अहमद लड्डा) तालुक्यातील सर्व भाजपा नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,बुथ प्रमुख ,शक्तीकेंद्र प्रमुख, कार्यकर्ते व सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की धर्माबाद परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या "गाईच्या दुधाला सरसगट" *दहा रुपये प्रति लिटर प्रमाणे अनुदान द्यावे* व दूध पावडर ( भुक्टीला) *निर्यातीला प्रति किलो पन्नास रुपये एवढा अनुदान देणे* व दूध खरेदीचा *दर प्रति लिटर तीस रुपये प्रमाणे करणे* या तीन प्रमुख विषयासाठी भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस मा.श्रावण पा. भिलवंडे व मा रविंद्र पोतगंटीवार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत ११:०० वा सकाळी धर्माबाद बासर रस्ता उपविभागीय पोलीस कार्यालया पुढे व धर्माबाद कारेगाव रस्ता रेल्वे गेट क्रमांक 2 च्या समोर ११:३० वाजता *रास्ता रोको आंदोलन* करण्यात येते आहे तरी या आंदोलनात आपण सहभागी व्हावे.


टिप्पण्या