*धर्माबाद नगरपालिकेच्या त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करा    [नऊ नगरसेवकांची रास्त मागणी

                 


धर्माबाद-( अहमद लड्डा )- धर्माबाद नगरपालिकेतील त्या चार निलंबित कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची विभागीय चौकशी करण्याची रास्त मागणी धर्माबाद नगरपालिकेतील नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे .                                                 सदरील चारही कर्मचाऱ्यांनी बोगस गावठाण, दाट वस्ती, व नाव परिवर्तन अशा प्रकरणात अतिशय बोगस कामे केल्याचे प्रथम दर्शनी सिद्ध झाल्यामुळे त्याबाबत तत्कालीन सचिव मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्यांना नोटीस बजावून खुलासा मागवला पण त्यांनी समाधानकारक खुलासा न दिल्यामुळे उपरोक्त चार पैकी तिघांना निलंबित केले होते .व कार्यालयीन सचिव तथा कर अधीक्षक रूकमाजी भोगावर यांच्या निलंबनाची कार्यवाही माननीय संचालक नगर विकास मंत्रालय वरळी मुंबई  यांच्याकडे वर्ग करण्यात आली होती त्या कार्यवाही वरील निर्णय अद्याप आला नसला तरी धर्माबाद नगरपालिकेतील उपरोक्त चार कर्मचाऱ्यांनी ज्यामध्ये रुखमाजी भोगावर, मारुती उल्डेलेवाड , नागेश संगणा अपुलोड व रमेश विठ्ठलराव घाटे  यांनी अक्षम्य अशी बनावट कामे करून नगरपालिका प्रशासनाची अब्रू वेशीवर टांगली आणि कोट्यवधीच्या पैशांचा गैरवापर केला म्हणून त्यांना निलंबनावरच न सोडता त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून उच्चस्तरीय विभागीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी धर्माबाद नगरपालिकेचे गटनेता प्राध्यापक बी.ए. गोणारकर ,नगरसेवक संजय पवार. सायारेड्डी गंगाधररोड,  निलेश पाटील, रिंकू सुरकुटवार, कविता बोल्मलवार महादाबाई वाघमारे, सुनिता जाधव, व अहेमदी बेगम आबेदआली ह्या नऊ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी केल्यामुळे धर्माबाद शहरात पुन्हा खळबळ उडाली असून सदरील कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या काही नगरसेवकाची व व राजकीय व्यक्तींची ही झोप उडाली आहे.


टिप्पण्या