- रविवारी १४ व्यक्ती करोना बाधित तर दोन दिवसात दोघांचा मृत्यू
कोरोनातून ११ व्यक्ती झाले मुक्त
नांदेड :- कोरोना आजारातून आज ११ बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यात देगलूर कोविड केअर सेंटर येथील १ बाधित व्यक्ती, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील ९ तसेच सोलापूर येथे संदर्भित झालेला ५ वर्षाचा एक बालक यांचा समावेश आहे. तर शनिवार, रविवार या दोन दिवसात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३२१ व्यक्ती कोरोनातून बरे झाले आहेत.
शनिवार ४ जुलै रोजी बिलोली येथील कोरोना बाधित ६५ वर्षाच्या एका महिलेचा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. रविवार ५ जुलै रोजी देगलूर येथील ५७ वर्षाच्या पुरुषाचा एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला आहे. या बाधितांना उच्च रक्तदाब, श्वसनाचा त्रास आदी आजार होते. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्यू व्यक्तीची संख्या २० एवढी झाली आहे.
रविवार ५ जुलै रोजी प्राप्त झालेल्या ९३ अहवालापैकी ६३ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. तसेच१४ बाधित व्यक्ती पॉझिटिव्ह आढल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधित व्यक्तींची संख्या ४३७ एवढी झाली आहे. यात उमर कॉलनी येथील ३२ वर्षाचा १ पुरुष, हबिबिया कॉलनी येथील २४ वर्षाची १ महिला, नांदेड तालुक्यातील हस्सापूर येथील ५९ वर्षाचा १ पुरुष, बिलोली इदगाह रोड येथील ६५ वर्षाचा १ पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील मंगळवारपेठ येथील ४५ वर्षाची १ महिला, मौसीन कॉलनी, देगलूर नाका येथील २० वर्षाचा १ पुरुष व १६ वर्षाची १ महिला, श्याम नगर नांदेड येथील २० वर्षाची १ महिला, श्रीनगर नांदेड येथील ४९ वर्षाची १ महिला, मस्तानशाह नगर हिंगोली येथील २२ वर्षाचा १ पुरुष, विष्णुपुरी नांदेड येथील २९ वर्षाचे २ पुरुष आणि किनवट येथील ४५ वर्षाचा १ पुरुष यांचा समावेश आहे.
आतापर्यंत ४३७ बाधितांपैकी ३२१ बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरीत ९६ बाधितांवर औषधोपचार चालू आहेत. यातील ९ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ५ महिला व ४ पुरुष बाधिताचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यात ९४ बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ३६ बाधित, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे ३८ बाधित तर मुखेड कोविड केअर सेंटर येथे २, हदगाव कोविड केअर सेंटर येथे १ बाधित तसेच जिल्हा रुग्णालय येथे ४, बिलोली कोविड केअर सेंटर येथे २ बाधित व्यक्ती, हिमायतनगर कोविड केअर सेंटर येथे २ उपचार घेत आहे. तर ११ बाधित औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. रविवार ५ जूलै रोजी १५६ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- १ लाख ४७ हजार २४१,
घेतलेले स्वॅब- ६ हजार ९६२,
निगेटिव्ह स्वॅब- ५ हजार ९६४,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- १४,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ४३७,
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- १६,
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,
मृत्यू संख्या- २०,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ३२१,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती – ९६,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची १५६ एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
सौजन्य prajapath com
COMMENTS